आम्ही कोण

"शिवविचारांचा जागर" या विचार मंचावर आपलं हार्दिक स्वागत

राजा शिवछत्रपती सांगायला सोपे आहेत, राजा शिवछत्रपती ऐकायला ही सोपे आहेत आणि राजा शिवछत्रपती जयघोष करणे सुद्धा खुप सोपे आहे पण राजा शिवछत्रपती अंगीकारणे खुप कठीण आहे आणि जो राजा शिवछत्रपतीना स्वतःच्या आचरणात आणेल, तो या संपूर्ण जगावर राज्य करेल.जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे.

सुर्यनारायण जर उगवले नसते तर आकाशाचा खरा रंगच समजला नसता जर राजे शिवछत्रपती जन्मलेच नसते तर, खरंच हिंदवी स्वराज्यचा अर्थच समजला नसता, हे हिंदु प्रभो शिवाजी राजा तुम्हाला त्रिवार मानाचा मुजरा.जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे.

अधिक वाचा..

शक्ती-भक्ती पायी दिंडी सोहळा

शक्ती-भक्ती पायी दिंडी सोहळा, शिवतीर्थ शहापूर ते शिवजन्मभूमी शिवनेरी, शिवविचारांचा जागर मंच द्वारे शिव विचार घराघरात, प्रत्येकाच्या मनामनात पोहचवण्याचं कार्य केलं जाते, याच मंचाच्या अंतर्गत शक्ती-भक्ती पायी दिंडी भव्य सोहळा, शिवतीर्थ शहापूर ते शिवजन्मभूमी शिवनेरी करण्यात आला.

शक्ती-भक्ती पायी दिंडी सोहळा

शिवविचार प्रत्येक व्यक्ती पर्यंत किंबगुणा प्रत्येकाच्या मनात रुजवावा या साठी सर्व समाज मान्यवरांन सोबत "शक्ती-भक्ती पायी दिंडी सोहळ्याच आयोजन शिवगर्भ भूमी शहापूर येथून करण्यात आले. सोबत शिववारकरी "मा. श्री. शरद फर्डे भाऊसाहेब.".

शक्ती-भक्ती पायी दिंडी सोहळा

शिवविचारांचा जागर करण्यासाठी महिलांचा सहभाग उल्लेखनीय, लहान थोरांच योगदानानाने "शक्ती-भक्ती पायी दिंडी सोहळा" शिवमय झाल्याचं दिसून येतो. .

शक्ती-भक्ती पायी दिंडी सोहळा

शिव विचारांचा जागर मंचा अंतर्गत "शक्ती-भक्ती पायी दिंडी सोहळा" अतिशय नियोजनात, शिवविचारांचा जागर करत शिवगर्भभूमी शहापूर पासून शिवविचारांचे वारकरी शिवजन्मभूमी कडे शिवपालखी मिरवणूक काढताना.

शिवविचार

"सह्याद्रीच्या कड्यावर एक देखणा वनराज उभा आहे. ज्यानं आपल्याला चार पायांखाली चार पातशाही दाबून टाकल्या आहेत आणि दिल्लीची पातशाही आपल्या शेपटीला गुंडाळून खाली दरी मध्ये विजयी मुद्रेने पाहत आहे."
प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवंत…सिहांसनाधीश्वर… योगीराज…श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय!

"दैवत श्री शिव छत्रपती”

निश्चयाचा महामेरू । बहुत जनांसी आधारू । अखंड स्थितीचा निर्धारू । ॥ श्रीमंतयोगी ॥ उगवत्या सूर्याला ग्रहण लागावं तसं महाराष्ट्रावर परकीय आक्रमण, जीवनात अंधकार पसरावं असं गडद शोषण,संस्कृती, समाज, धर्म, चालीरीती, मंदिर,आया बहिणी सर्व परकीय आक्रमनाणे अंधकारात गुडूप होत चालले होते, अशातच दगडाला पाझर फुटावा असं दिवस आला आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी येथे झाला.

जाणता राजा, शिवाजी महाराजांनी जो पराक्रम गाजवला, ज्या प्रकारे लयाला गेलेल्या भारतीय हिंदू संस्कृतीला नवसंजीवनी दिली, त्या गोष्टीने प्रभावित होऊन रामदासांनी हि उपाधी शिवरायांना दिली.

जिजाऊ पोटी मराठ्यांचा राज अवतरला

मंदिर थरारली, शिवनेरीची तोफ कडाडली वार्‍याची कोवळी झुळूक दर्या खोर्यात दरवळली. जिजाऊ पोटी मराठ्यांचा राज अवतरला सांगत मुकी पाखर हि किलबिलली. नगारा वाजला, शाहिरी साज चढला. डंका डोंगरा आड सांगत सुटला,आता सह्याद्रीवर भगवा फडकणार !!!!

छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण

सिंहाची चाल, गरुडाची नजर, स्त्रियांचा आदर, शत्रूचे गर्दन, असेच असावे मावळ्यांचे वर्तन, हीच छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण.जय शिवराय

नाद “शिवरायांचा” सुटणार नाही.

सागराचे पाणी कधी आटणार नाही, स्वराज्याची आठवण कधी मिटणार नाही, हा जन्म काय, हजार जन्म झाले, तरी नाद “शिवरायांचा” सुटणार नाही. जय भवानी जय शिवाजी

हे शिवराय प्रणाम तुजला कोटी कोटी

प्राणपणाने लढून राजा तुच जिंकले किल्ले, दुष्मनांचे सदा परतून तुच लावले हल्ले, धर्मरक्षणा तुच घेतला जन्म जिजाऊ पोटी, हे शिवराय प्रणाम तुजला कोटी कोटी…!

कार्यक्रम

छत्रपती शिवरायांचे शिवविचार प्रत्येक गावात प्रत्येक घरात. प्रत्येकाच्या मना- मनात. पोहोचविणेसाठी चला तर मग,
आपणही शिविचारांचा जागर परिवाराचे सदस्य होऊन आपणही शिव विचारांचेवारकरी होऊ या..!

शिवजयंती २०२४

शिवजयंती २०२४

शिवजयंती सोहळ्यानिमित्त "शिवविचारांचा जागर" या विचार मंचाच्यावतीने भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून विविध स्पर्धा देखील घेण्यात येणार आहेत.

Detail
शिवजयंती २०२४

शिवजयंती २०२४

शिवजयंती सोहळ्यानिमित्त "शिवविचारांचा जागर" या विचार मंचाच्यावतीने भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून विविध स्पर्धा देखील घेण्यात येणार आहेत.

Detail
शिवजयंती २०२४

शिवजयंती २०२४

शिवजयंती सोहळ्यानिमित्त "शिवविचारांचा जागर" या विचार मंचाच्यावतीने भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून विविध स्पर्धा देखील घेण्यात येणार आहेत.

Detail

चित्रफिती

शिवविचारांचा जागर मंच शिवविचार प्रत्येकाच्या मनामनात,घराघरात पोहचवण्याचं कार्य करते, अंतर्गत " शक्ती-भक्ती पायी दिंडी सोहळा शहापूर (शिवतीर्थ) येथून शिवजन्म भूमी शिवनेरी संपन्न झाला.
संबंधित कार्यक्रमाच्या काही चित्रफिती.

" शक्ती-भक्ती पायी दिंडी सोहळा ”

शक्ती-भक्ती पायी दिंडी सोहळा शहापूर (शिवतीर्थ) येथून शिवजन्म भूमी शिवनेरी संपन्न झाला. शिवसेना उपनेते माननीय नामदार प्रकाशजी पाटील साहेबांचं, "शक्ती भक्ती दिंडी सोहळ्या" शुभप्रसंगी शुभेच्छा मनोगत.

" शक्ती-भक्ती पायी दिंडी सोहळा ”

शक्ती-भक्ती पायी दिंडी सोहळा शहापूर (शिवतीर्थ) येथून शिवजन्म भूमी शिवनेरी संपन्न झाला. संबंधित कार्यक्रमासाठी मार्गदर्शन.

" शक्ती-भक्ती पायी दिंडी सोहळा ”

शक्ती-भक्ती पायी दिंडी सोहळा शहापूर (शिवतीर्थ) येथून शिवजन्म भूमी शिवनेरी संपन्न झाला. संबंधित कार्यक्रमासाठी मार्गदर्शन.

बातम्या

ब्लॉग, वरून

शिवविचारांचा जागर मंच शिवविचार प्रत्येकाच्या मनामनात,घराघरात पोहचवण्याचं कार्य करते, अंतर्गत " शक्ती-भक्ती पायी दिंडी सोहळा शहापूर (शिवतीर्थ) येथून शिवजन्म भूमी शिवनेरी संपन्न झाला
शक्ती-भक्ती पायी दिंडी सोहळा शहापूर.

post-img
26 Dec
post-img
26 Jan
post-img
26 Jan
logo